Slider Image
Slider Image
Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

श्रीरामनगर  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 2214 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा 2 अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 7 मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी,बंधारे व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, व मका,गहू ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष व ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

श्रीरामनगर  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. रोहयो अंतर्गत गावातीत्ल हद्दीतील शिवार रस्ते खडीकरण,मजबुतीकरण,तसेच वयक्तिक फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत .स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रीरामनगर  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन  पाणीपुरवठा योजना गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे त्यामुळे १२ महिने गावाला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होतो

ग्रामपंचायत श्रीरामनगर येथे सध्या प्रशासक असून सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन गावाचा  विकास घडवून आणतात त्यामुळे  ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

श्रीरामनगर  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

श्रीरामनगर  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 5 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ. 812 हेक्टर  असून ग्रामपंचायतीमध्ये  वार्ड आहेत. एकूण 414 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २२१४ आहे. त्यामध्ये 1166 पुरुष व 1048 महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावात साठवण बंधारे असल्या मुळे पिकांना मुबलक पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४०°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात 6°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

श्रीरामनगर गाव द्राक्ष  उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

श्रीरामनगर  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, , कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

श्रीरामनगर  लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

लिंग संख्या
पुरुष १११६
स्त्रिया १०४८
एकूण २२१४

संस्कृती व परंपरा

श्रीरामनगर  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व साप्ताह, खंडेराव महाराज यात्रा  यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे श्रीरामनगर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील देवतेचे खंडेराव मंदिर,सावता महाराज मंदिर,लक्ष्मीमाता मंदिर ,मारुती मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

शेती क्षेत्र द्राक्षबागा – श्रीरामनगर द्राक्ष व ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जलसंधारण प्रकल्प – आचोळा नाल्या मुळे पाणलोट क्षेत्राचा विकास व जलसंधारणाची चांगली सोय यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.

जवळची गावे

श्रीरामनगर  गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे श्रीरामनगर  सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

निफाड, सोनेवाडी बु ,सोनेवाडी खु.नैताळे शिवरे,शिवडी,रामपूर , , ही श्रीरामनगर च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

जिल्हा परिषद प्रशासन


श्री.ओमकार पवार साहेब
श्री.ओमकार पवार साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)

डॉ. वर्षा फडोळ
डॉ. वर्षा फडोळ माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जि.प. नाशिक

पंचायत समिती प्रशासन


नम्रता चंद्रकांत जगताप
नम्रता चंद्रकांत जगताप माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)

श्री सुनील पाटील
श्री सुनील पाटील माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी

ग्रामपंचायत प्रशासन


श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई
श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई ग्रामपंचायत अधिकारी

महेश गोरखनाथ कापसे
महेश गोरखनाथ कापसे ग्रामपंचायत कर्मचारी

अतुल विठ्ठल शिंदे
अतुल विठ्ठल शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी

कृष्णा श्रावण शिंदे
कृष्णा श्रावण शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी

लोकसंख्या आकडेवारी


१२०६
२२१४
१११६
१०४८
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 9
Logo 10
Logo 11
Logo 12